श्रीकृष्ण राऊतांच्या असंग्रहित गझला-प्रा.राजेन्द्र मुंढे

मराठीत गझलची परंपरा मोरोपंत- अमृतराय- माधव पटवर्धन-सुरेश भट- अशी सांगितली जाते. खया अर्थाने मराठीत सर्वस्पर्शी व तंत्रशुद्ध गझल भरभरुन लिहिण्याचा मानही सुरेश भटांचाच. भटानंतरही मराठी गझल मोठया प्रमाणावर लिहिली जात आहे. परंतु मराठी काव्यप्रांतात गझलला अद्यापही स्वतंत्र जागा मिळवू शकली नाही. डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णीडॉ. राम पंडितडॉ. अविनाश सांगोलेकरवा.न.सरदेसाई अशी दोन-चार समीक्षकांची नावे सोडली तर या काव्य प्रकाराची मराठी समीक्षेने उपेक्षाच केली. विशेष म्हणजे हे समीक्षक स्वतःच गझल लिहिणारे आहेत. सुरेश भटांनी ज्या आग्रह-निग्रहाने गझल लेखन करुन गझल बद्दलची निष्ठा तहहयात जोपासली. याच मालिकेतील एक गझलकार आहेत डॉ. श्रीकृष्ण राऊत. सुरेश भटानंतर त्यांच्या एवढा प्रगल्भ आणि प्रतिभावान गझलकार म्हणून आज त्यांचेच नाव घ्यावे लागेल.
 
डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचा यापूर्वी गुलाल आणि इतर गझला या नावाने ५० गझलांचा संग्रह द्राब्दालय प्रकाशनाने १९८९ मध्ये प्रकाशित केला होता. यात आणखी वीस नवीन गझलांचा समावेश करुन त्यांनी स्वतः याच नावाने २००३ मध्ये दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. तर एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावर जन्म घेणाया तान्ह्या मुला हा कवितासंग्रह सुद्धा प्रकाशित झाला आहे.
 
गुलाल या गझलसंग्रहात ना.घ. देशपांडे आणि मंगेश पाडगावकर या दोन ज्येष्ठ कवींची पत्रे आहेत. हे दोन्ही कवी गेयनादमधूर कविता लिहिणारे . पाडगावकर तर गझलकारही आहेत. त्यांनी श्रीकृष्ण राऊतांची अनेक गझलवृत्तेबेमालुमपणे वापरण्याची विसंगती हेरुण वक्तृत्वपूर्ण उठाव देण्याच्या शैलीची पाठराखण केली आहे. ती करत असतांना पाडगावकरांनी राऊतांना अशा तर्‍हेच्या गझल वाचतांना नंतर-नंतर एकसुरीपणा येण्याचा धोका संभवतो. शैलीतील वक्तृत्वाचे घटक काहीशा भडकपणे स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करु लागतात. आणि उपरोधामागची सात्विक प्रेरणा फिकी होण्याची भीती दर्शवित तुमचे तसे झाले नाही. - पण पुढे तसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर माझ्यासमोर गेल्या काही वर्षातील पुस्तकानंतरच्या असंग्रहित एकोणीस गझला आहेत.

प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांना गझलसंग्रह भेट देताना 
सोबत सौ.उषा राऊत(डावीकडे)आणि सौ.सासणे(उजवीकडे)


तांत्रिक दृष्ट्या एकाही गझलेत चूक सापडणार नाही. कारण ‘मिटर’ ला ते पक्के आहेत. छंदशास्त्राचे अभ्यासकही आहेत. त्यांची भावानुकूल वृत्ती त्यांच्या गझलेत ठिकठिकाणी दिसून येते. ते तसे गोष्टीवेल्हाळ आहेत. चांगले वक्तेही आहेत. संभाषणकलेत ते निष्णात आहेत. खाजगी बैठकीतही असे काही रंगतात की श्रोते स्तंभित होऊन जातात. खेळीमेळीच्या वातावरणाशी समरस होऊन जाण्यासाठी जी एक विशेष मनोवृत्ती लागते. ती त्यांच्या ठिकाणी पुरेपूर आहे.
 
दोह्यात जीव नाहीगझलेत जान नाही.
 
शायर जगात दुसरा माझ्या समान नाही. (दुकान)
 
असे ते उपरोधाने म्हणू शकतात ते त्यामुळेच. या गझलात प्रेमविषयक गझल असल्या तरी त्यात भावच्छटांची विविधतावैचित्र्य आणि सूक्ष्मता आहे. प्रेमाची वेगळी तहा जाणवते ती अशी-
 
आनंदाचे देणे-घेणे करते नगदी, 
आठवणींची किती उधारी प्रेम मागते. 
किंवा
 
शेजेवरती सांगे ताबा घरी रुक्मिनी,
 
कोणी वेडी मीरा दारी प्रेम मागते. (समर्पण)

आपल्या सौंदर्य दृष्टीचा आविष्कार त्यांच्या गझलांमधून डोकावत असतो. त्यांच्या प्रतिमासृष्टीत निसर्ग येतो,तो वेगळेच सौंदर्य घेऊन.निअसर्गप्रतिमांच्या अंगाने ते जीवनानुभव टिपतात तो असा-
 
जमेल जेथे मैत्र जिवाचे
तिथे फुलांची लाव बाग तू. (पहारा) 
किंवा 
वाळवटांत हाच ओलावा
नेत्र पानावले स्मरु आपण. (शस्त्र)
 
त्यांच्या सौंदर्यप्रेमी काव्यात्म वृत्तीला व्यवहारी जोड मिळालेली आहे. काव्य आणि व्यवहार याचा त्यांच्या वृत्तीमध्ये मनोहर संगम पहायला मिळतो.
 
मी रिकामा गडे रिकामी तू 
दोन पेले रिते भरु आपण. (शस्त्र) 
किंवा
यादीत किराण्याच्या तारुण्य हरवले माझे,
 
आणून हसू उसने मी ओठ सजवले माझे. (उत्सव)
 
सामान्यतः गझलेची भाषा सहज सोपी असावी. आपण बोलतो अशी. शब्दसंयोजन केवळ माध्यम. एकदा कवीचा रसिकांबरोबर हृदयसंवाद सुरु झाला कीशब्दांचा आडपडदा विरुन गेला पाहिजे. गझल वाचल्यावर हा अनुभव त्यांच्या गझालांमधून आपल्याला निश्चितच मिळतो. त्यांची गझल एका मर्यादेपर्यंत उंच जाते आणि त्या पलीकडे ती परतत्वाला स्पर्श करते. ती सार्वकालिकतेच्या पातळीवर चढत जाते. वाचनानंतर दीर्घकाळ अस्वस्थ करण्याचेजीवनातील विविध प्रसंगी सोबत करण्याचे सामर्थ्य या गझलेमध्ये आहे. जगाच्या घेतलेल्या अनुभवातून सहज स्फुरलेले हे शेर जगरहाटी सांगून जातात. 
अभिप्राय जाणत्यांचा नाही खरा कुठेही,
 
प्रोत्साहानात होतो जो बोचरा कुठेही. (चेहरा) 
किंवा
 
घोडा मरे उपाशी गवताविना बिचारा,
 
पण गाढवास मिळतो खा तोबारा कुठेही. (चेहरा)
अनेक गझलकारांच्या शेरांच्या मांडणीत जाणवणारा तोचतोचपणाविशेषतः काफिया- रदीफ बाबतीतलाराऊतांना चांगलाच टाळता येतो. ते नवनवीन कल्पनाविषयविचार,इतकेच काय प्रतिमाही ताकदीने मात्रसजगपणे हाताळताहेत. म्हणूनच गोटीबंद शेर त्यांच्याकडून लिहिला जातोय.
 
घासतोस तू कपाळ रोज पत्थरावरी,
 
पावला कुणास देव ठोकरुन माणसे. (माणसे)
 
स्पष्टपणासहजता आणि उत्कटता ही गझलची त्रिसूत्री राऊतांना चांगलीच साधली आहे. कधी आपल्या अनुभवांना शब्दात बांधणं कठीण होऊन जातं. पुन्हा ते वृत्तबद्ध करुन मात्रांच्या चौकटीत बसवणं आणखीनच कठीण. मूळ अनुभूती प्रांजलप्रभावी असली तरी तिची अभिव्यक्ती होतांना मर्यादा पडत नाहीत. उत्कटतेने ओथंबून येणारेही काही शेर,काही ओळी असतात.-
 
माझी साधी ओळख तेव्हा विसरलीस तू,
 
आज एवढे काय आठवे मी गेल्यावर ! ( मी गेल्यावर )
श्रीकृष्ण राऊत यांची प्रखर सामाजिक जाणीवेची गझलच त्यांची खरी ओळख निर्माण करू पाहत आहेत. संत तुकाराम हे त्यांचे दैवतच. मागील गझलसंग्रहात तुकारामाच्या संदर्भातील ‘मंबाजी’ आणि आताच्या गझलातील ‘तुकारामा’ ह्या गझला मैलाचा दगड ठराव्या अशाच-
 
पुजार्‍यांच्या दिली हाती कुणी लाठी तुकारामा,
 
विठोबाला हवी तुमची अता काठी तुकारामा.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धगधगत्या संघर्षाने चवदार तळयाचे पाणी पेटले. गुलामगिरीची पुराणी प्रथा मोडणार्‍या या महामानवासाठी श्रीकृष्ण राऊतांनी शेर लिहिला आहे. -
अबलांच्या पाटीमागे कायदा उभा तू केला,
 
शिवलेल्या ओठांवर मग हक्कांची आली गाणी. ( चवदार तळयाचे पाणी )
शेतकयांच्या आत्महत्या आता कवितेचा - गझलचा विषय झाला आहे. राजकारण्यांपासून तर तज्ज्ञांपर्यंत उठला सुटला त्याला सल्ला देतो आहे. आत्महत्या करु नकोते पाप आहे. हे सांगतांना दिसतो. अशा लोकांना गझलकार शेतकर्‍यांच्या वतीने सांगत आहे. 
सांग कोणाला स्वतःचा जीव नाही लाडका,
आज दोराला गळयाचे खूप झाले सागंणे. ( आत्महत्त्या )
 
आज शेतकयांची अवस्था चोहोबाजूंनी विकट झाली असतांना त्याच्यासमोर कोणताच पर्याय शिल्लक नसतांना त्याने कसे जगावे हा प्रच्च्न आहे. यातूनच वर्धा जिल्ह्यातील ‘डोरली’गावाच्या गावकरांनी आपले गावच विकायला काढले. ही घटना राऊत गझलेत मांडतात ती अशी-
 
लावा खुशाल बोली विक्रीस गाव आहे;
 
चौकात मांडलेला अमुचा लिलाव आहे.(भाव)
अर्थातच आजच्या जागतिकीकरणाच्या काळात कुणीही ही बोली बोलले नाही. कारण- जे-जे जिवंत त्यांना कवडी मिळे न फुटकी
मुडद्यास पण म्हणे की मिळणार भाव आहे. (भाव)
सामाजिक परिस्थितीसमकालाचे ताणेबाणेजीवनजग यांच्या कटू अनुभवानंतर वैयक्तिक प्रतिक्रियाआत्मपरता,सामाजिक जीवनाची उबग हा सर्व प्राथमिक कढ ओसरला की हा समाज आहे तसा पत्करूनत्यातच राहून स्वतःला जमेल ते कार्य करावे. अशी कवी आपली सवतःचीच समजूत काढतांना दिसतो आणि त्यातूनच आशादायी गझल लिहिताना रमाईसाठी बाबासाहेबांचा तुटणारा जीव शब्दात ओततो-
 
मिळू दे सुखाचा तिला घास बुद्धा;
 
असे वंदना ही तुझा कारुण्याला. (वंदना)
 
श्रीकृष्ण राऊतांच्या गझलांमधून भावनेची गती तसेच अनुभवांचे चैतन्य आपल्याला अनुभवायला मिळते. काही गझलांमधून प्रेमानुभूतीतील हळवेपणाप्रेमभग्नता आपल्याला डिवचून जातेतर कुठे कवीची आकांक्षात्यांची ध्येयनिष्ठा आणि जीवनातील प्रतिकूल अनुभव व त्यातून बनलेली सामाजिक विचारसरणी जाणवून जाते.
 
संकेतसूचकताप्रतीक यांचा वापर त्यांनी मुक्त हस्ताने केलेला दिसतो. मात्र कधी-कधी सूचकता ही रसिकांच्या दृष्टीने दुर्बोधता ठरते. कारण नादरुप,रसभावध्वनी अशा अनेक दृष्टीने गझलेचा आस्वाद रसिकांना घेता आला पाहिजे. श्रीकृष्ण राऊतांनी जरी आपल्या एका गझलेत-
 
चोरुन रोज खातो उर्दू मधील लोणी;
 
सायीवरी मराठी माझे इमान नाही. (दुकान)
 
असे उपहासाने म्हटले तरी विशुद्ध गझल लिहिण्याकडेच त्यांचा ओढा राहिलेला आहे. भटांनंतर एवढी सातत्यपूर्णवैविध्यपूर्ण गझल लिहिण्याची साधना त्यांच्याकडून घडत आहे. पाडगावकरांना वाटणारी भीती श्रीकृष्ण राऊतांनी व्यर्थ ठरविली असून यातूनच त्यांची गझलविषयीची आस्था आणि निष्ठा प्रगट होते. आणि हेच श्रीकृष्ण राऊतांच्या गझलेचे बलस्थान ठरावे.
_______________________________________________
प्रा. राजेन्द्र मुंढे
 
आर्वी नाक्यामागेज्ञानेश्वर नगर
वर्धा - ४४२००१भ्रमणध्वनी ९४२२१४००४९ 
Email Id – rajendramundhe004@gmail.com
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा